वाटद-खंडाळा येथे घरफोडी; ८३ हजारांचा मुद्देमाल लांबवला

0

रत्नागिरी : वाटद-खंडाळा येथील घराच्या मुख्य दरवाजाची कडी-कोयंडा उचटकून अज्ञाताने सुमारे ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना ९ मे रोजी रात्री ११.३० ते १० मे रोजी सकाळी ६.१५ वा. कालावधीत घडली आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या त्यांचे दीर विनोद पंढरीनाथ गडदे यांच्या घरी झोपण्यासाठी गेल्या असताना त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कुलपासह कोणत्यातरी हत्याराने तोडलेला दिसून आला. फिर्यादी घरात गेल्यानंतर त्यांना बेडरुममधील लोंखडी कपाटाचा दरवाजा आणि लॉकर कोणत्यातरी हत्याराने उचकटून कपाटातील स्टीलच्या डब्यातील सोन्याचे ८० हजार रुपयांचे दागिने आणि रोख २७०० असा एकूण ८२, ७०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे समजले. या बाबत जयगड पोलिस ठाण्यात बुधवारी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 13-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here