श्रमदानातून बामणोलीत नळपाणी योजना

0

चिपळूण : बामणोली येथे दीप जनसेवा समिती, साळुंखे परिवार आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून नैसर्गिक जलस्रोतातून ग्रॅव्हिटी नळपाणी योजनेचे लोकार्पण झाले. या माध्यमातून पाणी घरोघरी पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.

करोना, महापूर अशा आपत्तीच्या वेळी दीप जनसेवा समिती आणि साळुंखे परिवार जनतेच्या मदतीला पुढे येतात. करोना व महापूर काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले होते. काही महिन्यांपूर्वी चिवेलीच्या जाडेवाडीतील ग्रामस्थांची पाणीटंचाई लक्षात घेऊन डोंगराच्या कुशीत असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांचे पाणी ग्रॅव्हिटीने ग्रामस्थांच्या घरोघरी पाणी पोहोचवले. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या पाणीटंचाईचा प्रश्न दूर झाला. आता बामणोली येथे नैसर्गिक जलस्रोताच्या आधारे ग्रॅव्हिटी नळपाणी योजना राबवली. सुमारे १२०० मीटर अंतरावरून झऱ्याचे पाणी बामणोलीतील डिंगणकरवाडी, गवळवाडी, बौद्धवाडी, पूर्व वणेवाडी, पश्चिम वणेवाडी येथील पाच वाड्यांमध्ये ग्रॅव्हिटीने पाणी पोहोचवण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनीदेखील मेहनत घेतली.
या नळपाणी योजनेचे लोकार्पण झाले. या वेळी सुभाष साळुंखे, विलास साळुंखे, दीपक साळुंखे, विकास साळुंखे, सुविधा साळुंखे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 13-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here