ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवावी; श्रीकांत शिंदेंचे आव्हान

0

मुंबई : तुमच्या पाठिशी लोक असतील तर निवडणुकांना सामोरे जा, निवडून या आणि मग नैतिकतेच्या गप्पा मारा, असे आव्हान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नैतिकतेच्या गप्पा ठाकरे गटाकडून मारल्या जात आहेत. मात्र नैतिकता शिल्लक असेल तर ठाकरे गटात उरलेल्या शिवसेना आणि भाजपच्या एकत्रित मतांवर निवडून आलेल्या आमदारांनी आधी राजीनामा द्यावा असं ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार श्रीकांत ठाकरे म्हणाले की, नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्यांनी 2019 मध्ये भाजप सोबत निवडणूक लढवली. एकत्रितपणे लोकांच्या समोर गेले, बॅनरवर फोटो लावले आणि युतीत निवडणूक आले. पण त्यानंतर मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसायला लागली. त्यासाठी दुसऱ्यासोबत संसार थाटला. नैतिकता असती तर दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले नसते, असा घणाघात खासदार डॉ. शिंदे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्षांची निवड वैध ठरवले आहे. त्यांना अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता काही जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापेक्षा हे मोठे झालेत आहेत, अशी खिल्लीही डॉ. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची उडवली.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, काही लोक बरळत सुटले आहेत. ते आता राज्यपाल्याचे पद बरखास्त करा, अशीही मागणी करू लागले आहेत. ठाकरे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते. मात्र ते स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले. निवडणुकीआधी केलेली युती नंतर तोडली ती नैतिकता होती का? ती जनतेसोबत गद्दारी आणि जनमताची प्रतारणा नव्हती का?

श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकीकडे नैतिकतेच्या गप्पा मारता दुसरीकडे न्यायालयाकडे पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवा अशी मागणी करायची. नैतिकतेच्या नावावर नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. कोर्टाने मात्र यांना राजीनाम्याची आठवण करून देत यांची मागणी फेटाळली आहे. अपात्रतेबाबत सर्व निर्णय विधानसभा उपाध्यक्षांना घेण्याचा अधिकार देण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. मात्र न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. त्यांची ती मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

यावेळी उदय सामंत यांनीही ठाकरे गटावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, कालपासून नैतिकतेचे धडे ज्यांना नैतिकता नाही ते देत आहेत. दुटप्पीपणा गेले काही महिने बघितले आहे. बारसूबाबत दुटप्पीपणा समोर आला. मुख्यमंत्री व्हायचं नाही अशा नैतिकतेच्या गप्पा मारायचा आणि पुन्हा पदावर बसवा असे सांगत आहेत. शिवसैनिक मुख्यमंत्री बनवणार म्हणाले आणि स्वतः झाले. त्यांच्या गटातील आमदार, खासदार आपल्यासोबत रहावेत यासाठी यासाठी खोटं बोललं जात आहे. संजय राऊत म्हणतात तीन महिन्यात पुन्हा न्यायालय निकाल देईल, असे खोटं पसरवत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 13-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here