५६ डझन आंबे चोरले; गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील देवधे -गुरववाडी येथील आंबा बागेतील ८०० रुपये डझन किमतीचे ५६ डझन आंबे चोरणाऱ्या संशयिताविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र पुनाजी मसणे (वय ५०, रा. पन्हेळे मसणेवाडी, ता. लांजा) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. ११) रात्री राजाराम मसाणे यांच्या आंबा बागेत घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने आबा बागेतील आंबा कलमाच्या झाडावरील ८०० रुपये डझन असे ५६ डझन आंब्यांची चोरी केली. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लांजा पोलिस अंमलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 13-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here