मुंबई : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस ११९, जेडीएस २५ तर भाजपा ७२ जागांवर आघाडीवर आहे.
तर इतर ८ जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.
कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयी वाटचालीवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा कर्नाटकचा निकाल हा देशाला एक नवी दिशा देणारा आहे. सर्व मतदारांचे अभिनंदन. जिंकून आलेल्या उमेदवारांचंही अभिनंदन. तसेच काँग्रेसचे प्रमुख मलिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांचंही भास्कर जाधव यांनी अभिनंदन केलं आहे. भाजपा हटाव संविधान बचाव, भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:54 13-05-2023
