कर्नाटक जिंकले पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस हरले

0

नवी दिल्ली : एकीकडे कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले असताना तिकडे सर्वात मोठे आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्येभाजपाने सपा, काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे.

युपीमध्ये विधानसभा पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेस, सपाला विधानसभा सीट, नगरपालिकांसह पंचायत समित्यादेखील गमवाव्या लागल्या आहेत.

सपाच्या आझम खान यांच्या रामपूरमधील स्वार टांडा पोटनिवडणुकीत सीटवर भाजपासोबत असलेल्या अपना दलाचे शफीक अंसारी जिंकले आहेत. सपाने ही जागा वाचविण्यासाठी हिंदू उमेदवार दिला होता. अनुराधा चौहान यांचा 9734 मतांनी पराभव झाला आहे. भाजपाने आझम खान यांची लोकसभेची रामपूर सीटही आपल्या ताब्यात घेतली होती. तसेच त्यानंतर विधानसभेची सीटही ताब्यात घेतली होती.

दुसरीकडे नगर परिषद, नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या महापौरपदाच्या, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांतही भाजपाने सपा, काँग्रेसचा गेम केला आहे. १७ पैकी १७ नगर परिषदा भाजपाने आपल्याकडे ठेवल्या आहेत. तर १९९ नगर पालिकांपैकी भाजपाने ८८, सपाने ३५, काँग्रेस ५, बसपा २१ आणि इतर ५० जिंकल्या आहेत.

तर ५४४ नगर पंचायतींपैकी भाजपाने आपल्याकडे 169 पंचायती खेचल्या आहेत. सपाने ७२, काँग्रेस ७, बसपा ३५ आणि इतर १५० जिंकल्या आहेत. कर्नाटकात काँग्रेस जिंकली असली तरी उत्तरेत काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 13-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here