रत्नागिरी : जिल्ह्यात मागील काही दिवसात, काही इसम अमली पदार्थांची खरेदी व विक्री करत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती.
या अनुषंगाने, मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक, श्री. हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. डॉ. समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस पथक गठित करण्यात आले.
दिनांक 12/05/2023 ते 13/05/2023 च्या दरम्याने, या विशेष पोलीस पथकाद्वारे रत्नागिटी शहारामधील विविध ठिकाणी गस्त घालण्यात येत होती.
या पथकामधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार श्री. शांताराम झोरे यांना धनजीनाका आंबेडकर रोड येथील श्री. रशिद हकीम यांचा मुलगा मुबीन हकीम हा त्याचे राहते घरी अंमली पदार्थ विक्री करिता ठेवत असले बाबत गोपनीय बातमी प्राप्त झाली. मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने, पंचासमक्ष झडती घेतली असता सदर घराच्या दुसया मजल्यावर असलेल्या रूम मध्ये आवाज आल्याने रूमचा दरवाजा उघडून पाहता, त्याठिकाणी दोन इसम 23.55 वाजता संशयितरित्या बसलेले दिसेले तसेच रूममध्ये फॉईल पेपरचे तुकडे, सिगारेटचे अर्धवट जळालेले तुकडे दिसून आल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या दोन्ही इसमांची चौकशी करण्यात आली व या चौकशी दरम्याने त्यानी आपली नावे, 1) मुबिन रशिद हकीम, वय 22 वर्षे, रा. धनजीनाका, आंबेडकरवाडी, जाणाऱ्या टोडवर, ता.जि. रत्नागिटी व 2) मस्तान मकदूम शेख व 24 वर्षे, रा. मच्छिमार्केट, बाजारपेठ, ता. जि रत्नागिटी अशी सांगितली तसेच या पथकामार्फत लागलीच त्याची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली.
या कारवाई मध्ये आरोपी मुबिन रशिद हकीम, याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टचे उजवे खिशात एका प्लास्टीकच्या पिशवीमध्ये कागदाच्या एकूण 115 लहान लहान पुड्यांमध्ये टर्की पावडर व डाव्या खिशात स्मोकींग ब्राऊन पेपर मिळून आले तसेच आरोपी मस्तान मकदूम शेख याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिशात एका पारदर्शक प्लास्टीकच्या पिशवीमध्ये गांजा मिळून आला.
दोन्ही आरोपींच्या अंगझडती मध्ये मिळून आलेले अंमली सदृश्य पदार्थांची अंमली पदार्थ तपासणी किट व्दारे तपासणी केली असता ते ब्राऊन हेरॉईन व गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे पंचांसमक्ष वजन करण्यात आले ज्यामध्ये ब्राऊन हेरॉईन 2.94 ग्रॅम व व गांजा 16.58 ग्रॅम आहे. तसेच दोन्ही आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक 15/05/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रीमांड देण्यात आलेली आहे.
आरोपी) मुबिन रशिद हकीम, वय 22 वर्षे, रा. धनजीनाका, आंबेडकरवाडी, जाणारे रोडवर, ता. जि. रत्नागिरी व 2) मस्तान मकदूम शेख व 24 वर्षे, टा. मच्छिमार्केट, बाजारपेठ, ता. जि. रत्नागिरी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्या अंगझडती मधून मिळून आलेला ब्राऊन हेरॉईन व गांजा हा अमली पदार्थ व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले आहे व रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 125 / 2023 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 20 (ब), 22 (ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई, विशेष पथकातील खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
1) श्री. डॉ. समाधान पाटील, परि. पोलीस उपअधीक्षक,
(2) सपोनि श्री संजय पाटील, नियंत्रण कक्ष, रत्नागिरी,
3) सपोनि श्री अमर पाटील, आ.गु.शा, रत्नागिरी
4) पोऊनि श्रीमती शितल पाटील, नियंत्रण कक्ष, रत्नागिरी,
5) सपोफो / 458 विलास दिडपसे, स्था.गु.शा, रत्नागिरी,
6) पोहवा / 251 शांताराम झोरे, स्था.गु.शा, रत्नागिटी,
7) पोहवा / 477 नितीन डोमणे, स्था. गु.शा, रत्नागिरी,
8) पोहवा / 574 अरुण चाळके, स्था. गु. शा, रत्नागिटी,
9) पोहवा / 301 बाळू पालकर, स्था.गु.शा, रत्नागिरी,
(10) पोहवा / 135 सागर साळवी, स्था.गु.शा, रत्नागिरी,
11) पोहवा / 1238 प्रविण खांबे, स्था.गु.शा, रत्नागिटी,
12) पोहवा / 1410 सत्यजित दरेकर, स्था.गु.शा. रत्नागिटी,
13) पोहवा / 265 योगेश नार्वेकर, स्था. गु.शा, रत्नागिरी,
14) पोशि/ 262 विवेक रसाळ, स्था.गु.शा, रत्नागिटी,
15) पोहवा / 792 विद्या लांबोटे, महीला कक्ष,
16) पोहवा / 971 छाया चौधरी, महीला कक्ष,
(17) पोहवा / 1347 सांची सावंत, महीला कक्ष,
(18) पोशि/ 1592 अक्षय कांबळे, फॉरेन्सिक युनिट,
19) पोहवा / 1238 प्रविण खांबे, स्था.गु.शा, रत्नागिरी
20) पोहवा / 135 सागर साळवी, स्था. गु.शा. रत्नागिटी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 13-05-2023
