खेड : खेड-शिवतर मार्गावरील मुरडे शिंदेवाडीनजीक कालव्यामध्ये रिक्षा उलटून अपघात झाला. यामध्ये एक महिला ठार, ६ जण जखमी झाले होते. त्यापैकी एका गंभीर जखमीचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे.
या प्रकरणी रिक्षाचालक शशिकांत मोरे (रा. भरणे) याच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरडे शिंदेवाडी येथे लग्नासाठी ६ ते ७ मे रोजी रिक्षाने निघाले होते. रिक्षा दोन वाजण्याच्या सुमारास मुरडे शिंदेवाडी येथील रस्त्यावर तीव्र चढावात चढत असताना मागे उताराने घसरत जाऊन रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या नातूनगर धरणाच्या कालव्यात कोसळली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 13-05-2023
