IPL 2023 : मुंबईला हरवून टॉप-3 मध्ये पोहोचली लखनौ; पराभवामुळे मुंबई प्लेऑफमधून बाहेर?; जाणून घ्या Points Table ची स्थिती

0

लखनौ सुपर जायंट्स (LSG) नं मुंबई इंडियन्स (MI) चा अवघ्या 5 धावांनी पराभव केला. मुंबईचा पराभव झाला असला तरी अजुनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी मुंबईकडे आहे.

13 सामन्यांत 7 विजय मिळविल्यानंतर लखनौ आता 15 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आता जर लखनौनं शेवटचा साखळी सामना जिंकला तर त्यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. लखनौ संघाचा सध्या नेट रनरेट 0.304 आहे.

लखनौ विरुद्धच्या सामन्यातील पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं नुकसान नक्कीच झालंय. पण, त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी अजुनही संघाकडे आहे. मुंबईचा संघ 13 सामन्यांनंतर 14 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता जर मुंबईला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं तर मात्र यंदा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं मुंबईचं स्वप्न अधुरंच राहिल.

चेन्नईसाठी दिल्लीविरोधात जिंकावच लागेल

सध्या पॉईंट टेबलमध्ये 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यासाठी शेवटचा साखळी सामना जिंकणं आवश्यक आहे. चेन्नई सुपर किंग्जला 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे आणि त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर मात्र ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून वंचित राहू शकतात.

आरसीबीला शेवटचे दोन्ही सामने जिंकावेच लागतील

लखनौच्या मुंबईविरुद्धच्या विजयानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्लेऑफचा रस्ता थोडा कठीण झाला आहे. सध्या, RCB 12 सामन्यांत 6 विजय आणि 6 पराभवांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. संघाला अजून 2 साखळी सामने खेळायचे आहेत आणि हे दोन्ही सामने जिंकल्यानंतर ते प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं करू शकतात. मात्र आता संघाला इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.

पंजाबला अजूनही संधी, राजस्थान अन् कोलकाता प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर

पंजाब किंग्जचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. पंजाब सध्या 12 सामन्यांत 6 विजयांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. जर पंजाबनं त्यांचे शेवटचे 2 साखळी सामने जिंकले तर त्यांचे 16 गुण पूर्ण होतील आणि अशा परिस्थितीत ते प्लेऑफसाठी त्यांचं स्थान निश्चित करू शकतात. मात्र, त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे.

गेल्या सीझनमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं खूप कठीण दिसत आहे. राजस्थानचे सध्या 13 सामन्यांत 12 गुण आहेत आणि शेवटचा सामना जिंकल्यानंतर त्यांना केवळ 14 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. दुसरीकडे, कोलकाता नाइट रायडर्सचीही अशीच स्थिती आहे, ज्यांचे 13 सामन्यांनंतरही 12 गुण आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 17-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here