24 वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

0

इंग्लंड : इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये 2022 ला होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल स्पर्धा समितीने आज राष्ट्रकुल स्पर्धेत महिला टी 20 स्पर्धेचा समावेश केल्याची घोषणा केली. 1998 ला राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या एकदिवसिय क्रिकेट स्पर्धेचा समावेश केला होता. त्यानंतर 24 वर्षांनी महिला क्रिकेट टी 20 स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत एजबेस्टन मैदानावर आठ दिवस आठ संघ राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच महिला टी 20 स्पर्धेचा समावाश करण्यात आला आहे. 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. या स्पर्धेत 4 हजार 500 खेळाडू 18 क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटच्या समावेशानंतर  आसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनु स्वाहनी  यांनी आनंद व्याक्त करत ‘महिला क्रिकेटसाठी ही एतिहासिक बाब आहे. महिला क्रिकेट जागतिक स्तरावर दिवसेंदिवस सक्षम होत आहे. राष्ट्रकुल स्पर्धा संघटनेने बर्मिंगहॅम मध्ये होणाऱ्या 2022 च्या महिला क्रिकेटचा समावेश केल्याने आनंदी झालो आहोत.’ अशी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी यामुळे महिला क्रिकेट जागतिक स्तरावर वाढण्यास चांगला फायदा होणार असल्याचेही सांगितले. जरी राष्ट्रकुल स्पर्धेत महिला टी 20 क्रिकेट स्पर्धेचा समावेश केला असला तरी या स्पर्धेतून भारताला सर्वाधिक पदके मिळवून देणारा खेळ नेमबाजी वगळण्यात येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे भारतासाठी कही खुशी कही गंम अशी परिस्थिती आहे. 

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here