युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान मोदींना भेटणार

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 क्वाड गटासह काही प्रमुख बहुपक्षीय शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी आज( शुक्रवारी) जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.

तीन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान 40 हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. द्विपक्षीय बैठकींसह शिखर परिषदांमध्ये दोन डझनहून अधिक जागतिक नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचाही समावेश आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये युद्धाच्या परिस्थितीवर आणि त्यावर राजकीय तोडगा काढण्यावर चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी शुक्रवारी हिरोशिमाला पोहोचतील तर झेलेन्स्की शनिवारी G7 मध्ये सहभागी होण्यासाठी हिरोशिमात दाखल होतील.

झेलेन्स्कींचे मोदींना पत्र
गेल्या महिन्यात झेलेन्स्कींनी पीएम मोदींना पत्र लिहून मदतीची विनंती केली होती. या पत्रात त्यांनी युक्रेनला अतिरिक्त मानवतावादी मदत पाठवण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री एमीन जापरोवा हेही तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. दरम्यान, यापूर्वी भारताने अनेक वेळा रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले आहे.

इतर अनेक नेत्यांना भेटणार
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी शनिवारी हिरोशिमा येथे जपान, कोरिया, व्हिएतनाम, फ्रान्सच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय रविवारी ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जपानने हिरोशिमा (याच ठिकाणी जगातील पहिला अणुबॉम्ब टाकला गेला होता. ) येथे जी 7 परिषद आयोजित केली आहे. अशा स्थितीत पंतप्रधान फुमियो यांचा हा प्रयत्न अण्वस्त्रविरोधी संदेशाला चालना देणारा असल्याचे बोलले जात आहे.

मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर
पीएम मोदी 6 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. जपाननंतर पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनीला जाणार आणि शेवटी सिडनीला जातील. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच पापुआ गिनी दौरा असेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 19-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here