हातखंबा येथे झालेल्या अपघातात ५ जण जखमी

रत्नागिरी : दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक होऊन दुपारी हातखंबा येथे झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. यातील जखमींना तात्काळ नरेंद्र महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार इब्राहिम नेवरेकर( वय-५१) व अरसालन अल्ताफ मुकादम (वय-१४) हे दोघे दुचाकीवरून रत्नागिरी ते लांजा असे निघाले होते. त्यांची दुचाकी हातखंबा गद्रे पेट्रोल पंपाचे समोर आली असता मुंबईहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोची धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार नेवरेकर व मुकादम तसेच टेम्पोतील अन्य तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:56 PM 02-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here