खरीप हंगामासाठी ३२ वाणाचे भात बियाणे उपलब्ध

0

रत्नागिरी : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका खरेदी विक्री संघात ३२ वाणांचे भात बियाण्यांची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. या बियाण्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

यावर्षी खरीप हंगामाचे नियोजन प्रशासकीय स्तरावर पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये खत निविष्ठा आणि बियाण्यांचे वितरण करण्याचा आराखडा कृषी विभगाने केला आहे. पहिल्या टप्प्यात बियाण्यांची उपलब्धता करुन देताना कृषी विभगाने प्रस्तावित केलेली आणि जमिनीच्या पोतानिहाय देशी भात वाणांची उपलब्धता करण्यात आली असून, त्याचा पुरवठा सर्व तालुका खरेदी विक्री संघात करण्यात आला आहे.

यामध्ये रासी पूनम मध्यम ६ किलो ६९० रुपये, सिल्की जाड ५ किलो ६५० रु., कोमल बारीक ५ किलो ६५० रु., सुप्रिया मध्यम ५ किलो ७२५ रु., किलो ७२५ रु., वैष्णवी एनआर २४४१ मध्यम ३ किलो ३९५ रु., वैष्णवी एनआर-२४१-५ किलो ६४५ रु., रुपाली बारीक ३ किलो ३५१ रु. मधुमती लांब ३ किलो ५२० रु., अमानी बारीक ३ किलो ३४६ रु. प्रसन्ना ५ किलो ८०० रु., साईराम एनआर ९-५ किलो ७६५ रु., अंकूर सोनम ३ किलो ३५१ रु., अंकूर श्री १०१, ५ किलो ६१० रु., अमोघ मध्यम ६ किलो ७२० रु., एमटीयू ७०२९, १० किलो ९४५ रु. तर ५ किलोला ४९५ रु., कावेरी चिंटू दाणा बारीक ५ किलो ८७५ रु., सीताराम १० किलो ९०० रु., जया दाणा आखूड जाडा १० किलो ८०० रु., साई २१२ बारीक ३ किलो ४२५ रु., सुवर्णा महाबीज मध्यम १० किलो ५८० रु., महाबीज जया आखूड दाणा १० किलो ५३० रु., अंकूर सुवर्णा मध्यम २५ किलो २२२५ रु., वाडा कोलम बारीक ५ किलो ६५० रु., अराईस ६ हजार ४४४, १ किलो ४१५ रु., एनपीएच- ३०, १ किलो ४४० रु., सम्राट गोल्ड १ किलो ४३० रु., टाटा ७४८-१ किलो ३४५ रु., अराईस ६१२९ बारीक १ किलो ३५५ रु. महिम १ किलो ४४० रु., एनपीएच ४ सह्याद्री १ किलो ४४० रु. तेज मध्यम १ किलो ३६५ रु. अशी विक्री सुरू करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 22-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here