रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज जवळ अजस्त्र वृक्ष कोसळला

रत्नागिरी : नाणीज जवळील नविन मठाजवळ निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाने अजस्त्र वृक्ष आज सकाळी उन्मळून पडला. स्थानिकांच्या मदतीने उन्मळून पडलेला वृक्ष रस्त्यावरून बाजूला काढला गेला. अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नाणीज येथील तलाठी मेस्त्री, पोलिस पाटिल नितीन कांबळे, उपसरपंच दत्ताराम खावडकर, यांचे सहित अनेक ग्रामस्थ घटनास्थळि दाखल झाले.त्वरीत घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने पडलेल्या वृक्ष बाजूला करण्यात आला. वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली. सध्या रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर अनेक ठिकाणी असे जुनाट आणि धोकादायक वृक्ष आहेत त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे फक्त चक्रीवादळाच्या दिवशीच नव्हे तर संपूर्ण पावसाळाभर ही दक्षता घेणे गरजेचे आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:10 AM 03-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here