आसगे येथे २८ रोजी बैलगाडी स्पर्धेचे आयोजन

0

आसगे : आसगे पंचक्रोशी शेतकरी मंडळाच्यावतीने रविवार दि. २८ मे रोजी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आसगे येथील देवाचा माळ येथे स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक ढाल व रोख रुपये स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्याला रोख रुपये १५ हजार, द्वितीय १२ हजार, तृतीय १० हजार, चौथ्याला रु. सातशे, पाचव्याला रु. ५०० व ढाल तर सहा व सात क्रमांक विजेत्यांना ढाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेतील नावनोंदणी व अधिक माहितीसाठी भाई मांडवकर, प्रभाकर टोळे, पांडुरंग पांचाळ, महेश सप्रे, अल्लाउद्दीन नेवरेकर, मोहन देसाई यांच्याकडे संपर्क करावा. बैलगाडी स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन आसगे पंचक्रोशी शेतकरी मंडळ, आसगेच्यावतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 24-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here