मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2023 Declared) झाला आहे.
मागीलवर्षी राज्याचा निकाल 94.22 टक्के होता. यावेळी तो 91.25 टक्के आहे. म्हणजे मागीलवर्षी पेक्षा यावर्षीचा निकाल 2.97 टक्क्यांनी कमी झाला आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या अगोदर निकाल 90.66 टक्के
यंदा बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या होत्या. कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षेत अनेक बदल करण्यात आले होते. कोरोनामुळे पहिल्या वर्षी परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. तर गेल्या वर्षी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या होत्या. तसेच परीक्षांसाठी वेळ देखील वाढवून देण्यात आला होता. यंदा मात्र परीक्षा घेताना कोणतीही सवलत देण्यात आली नव्हती परिणामी याचा परिणाम निकालावर पाहायला मिळत आहे. मात्र कोरोना आधीच्या म्हणजे फेब्रुवारी – मार्चमध्ये लागलेल्या निकालापेक्षा यावेळचा निकाल 0.59 ने अधिक आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या अगोदर निकाल 90.66 टक्के लागला होता.
मागील तीन वर्षाचा तुलनात्मक निकाल
शाखा | 2020 | 2021 | 2022 | 2023 |
विज्ञान | 96.93 | 99.45 | 98.30 | 96.09 |
कला | 82.63 | 99.83 | 90.51 | 84.05 |
वाणिज्य | 91.27 | 99.91 | 91.71 | 90.42 |
व्यवसाय अभ्यासक्रम | 86.07 | 98.80 | 92.40 | 89.25 |
एकूण | 90.66 | 99.63 | 94.22 | 91.25 |
मार्च- एप्रिल 2022 चा निकाल 94.22 टक्के होता. फेब्रुवारी-मार्च 2023 चा निकाल 91.25 टक्के होता. त्यामुळे मार्च एप्रिल 2022 च्या तुलनेत या वर्षी निकाल 2.97 टक्के कमी आहे. फेब्रुवारी- मार्च 2020 च्या निकालाची तुलना करता फेब्रुवारी – मार्च 2023 चा निकाल 0.59 वाढला आहे. 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 25-05-2023
