चिंचघरी, पेढे, वालोपेतील हातभट्टीवर कारवाई

0

चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी, पेढे व वालोपे येथील गावठी अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी संयुक्तपणे धाडी टाकल्या. या दोन्ही गावांत चार ठिकाणी कारवाई करण्यात आली.

या धाडीत ४ हजार ७०० लिटर रसायन व २०६ लिटर हातभट्टी गावठी दारू असा एकूण १ लाख ३५ हजार २४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रसायन व इतर साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वालोपे, पेढे व चिंचघरी येथील ४ अवैध गावठी दारू हातभट्टीवर कारवाई केली. याप्रकरणी महेश नंदकुमार नागवेकर, मंदार मधुकर दिवेकर, मनोज दशरथ बुरटे, आशिष सुधाकर चाळके अशा चार संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हातभट्टी निर्मिती करणारे मुख्य सुत्रधार कोण आहेत? याबाबत कसून चौकशी केली जात आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाचे निरीक्षक व्ही. एस. मासमार, जे. एस. खुटावळे, जी. एस. नाईक, एम. बी. पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनीष कांबळे, आर. बी. भालेकर, एस. एन. वड यांनी सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 26-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here