जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज इन्स्टिट्यूटचा १२ वी चा निकाल शंभर टक्के

0

नाणीज : श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा बारावी सायन्स व कॉमर्स या दोन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या इन्स्टिट्यूटने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

दोन्ही शाखांचे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी असे- विज्ञान शाखेमध्ये प्रथम कामेरकर गौरी प्रमोद, घाटीवळे, (गुण ८३ टक्के), द्वितीय नाईक प्रसाद विनायक, नाणीज,( ८२.६७ टक्के ) तृतीय घडशी मानस दीपक, पाली, (८२.५० टक्के.)

वाणिज्य विभाग- प्रथम गराटे सिद्धी सुरेश साठरे बांबर( ७३ टक्के) द्वितीय शेट्ये ऋतुजा वीरेंद्र, साखरपा कोंडगाव(७२.८३ टक्के ) तृतीय अकेमोड पिंकू लक्ष्मण, नाणीज (६७.६७ टक्के.)

सर्व विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे चेअरमन अर्जुन फुले , प्राचार्या अबोली पाटील, ज्येष्ठ शिक्षक- कीर्तीकुमार भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. त्यामध्ये १२ वी सायन्सचे वर्गशिक्षक सूर्यदीप धनवडे, १२ वी कॉमर्सच्या वर्गशिक्षिका दीपाली झोरे, तसेच त्रिशा सुवारे, सूर्याजी होलमुखे, अक्षया शिगम, पूजा ताम्हणकर, सुरज मांडेलकर, आरती तरस, बाबुलाल सौदागर, लव सावंत, विशाल माने आदी शिक्षकानी प्रयत्न केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. येथे के.जी. ते बारावी पर्यंतचे शिक्षण सर्वांना मोफत दिले जाते. नाणीज पंचक्रोशीतील वाड्या-वस्त्यावरील गोरगरिबांची मुले येथे शिक्षण घेत आहेत.

आजच्या या निकालामुळे सर्व विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 25-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here