रिक्षा मालक-चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

0

रत्नागिरी : आता जनतेला कार्यालायत येण्याची आवश्यकता नाही. अधिकारीच आपल्या गावात येणार आहेत. गावातील प्रत्येकाला शासनाच्या ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तो लाभ गावात राहूनच मिळणार आहे. यासाठी पाच मोबाईल तहसिलदार कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. तर समाज्यातील सर्वात महत्वाचा घटक असलेल्या रिक्षा व्यावसायिकांसाठी रिक्षा मालक-चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी केली. शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.

शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ रत्नागिरीत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे जाहिर आभार मानले. ते पुढे म्हणाले, आज अधिकारी तुमच्या गावात येत आहेत. हा पहिला उपक्रम आहे. यापुर्वीच्या कोणत्याच सरकारने असा उपक्रम राबविलेला नाही. हा उपक्रम राबविताना जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्वाची आहे. ते आपली भूमिका उत्तमरित्या बजावत असल्यामुळेच योजना यशस्वी होत आहे असे ना.सामंत यांनी सांगितले.

रिक्षा हा घटक प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे. त्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न यापुर्वीर्च्या एकाही सरकारने केलेला नाही. त्यांच्याही समस्या खूप आहेत. त्यांना त्या मांडण्यासाठी व्यासपिठ नाही. मात्र मुख्यमंत्री ना.शिंदे व उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी रिक्षा व्यावसायिकांची दखल घेत त्यांच्यासाठी स्वतंत्र रिक्षा मालक-चालक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची अंमलबजावणी येत्या दोन दिवसात होणार असल्याचे ना.सामंत यांनी जाहिर केले.

आता शासकिय योजनांपासून कोणीही वंचित राहणार नाही.याची दखल शासन घेणार आहे. राज्यात पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यात मोबाईल तहसिलदार कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. आता आपल्याला तहसिलदार कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तहसिलदार कार्यालय आपल्या गावात येणार आहे. त्याद्वारे शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. विविध दाखल,संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा महिलांना मानधन योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासन घेणार असल्याचेही ना.सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 26-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here