रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यापासून आता दिलासा मिळणार आहे. कोकण किनारपट्टी भागात कमाल तापमानात पुढील तीन दिवसांत हळूहळू चार ते सहा अंशांपर्यंत घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्यामुळे कोकणातील जिल्ह्यात उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा आणि तुरळक भागांत पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान आणि आर्द्रता यांमुळे कोकणात उकाडा जाणवत होता.
मात्र, यंदा मोसमी पावसाचे आगमन काहीसे लांबण्याची शक्यता असली तरी आता काही प्रमाणात उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 26-05-2023
