IPL 2023 Qualifier 2 : मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीत तिकीट मिळणार की गतविजेता गुजरात बाजी मारणार..?

0

आयपीएल 2023 (Indian Premier League) मधील दुसरा क्वालिफायर (IPL Qualifier 2) सामना आज पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या संघात रंगणार आहे.

आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पार पडणार आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यातील विजयी संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. या सामन्यातील विजेता संघाचा सामना रविवारी अंतिम फेरीत चार वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाशी होईल. आयपीएल 2023 चा बहुप्रतिक्षित अंतिम सामना 28 मे रोजी पार पडणार आहे.

कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट?
चेन्नई सुपर किंग्स संघाने (CSK) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये (IPL 2023 Qualifier 1) गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करून थेट अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या मोसमात याआधी हे दोन संघ आमने-सामने आले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. या मोसमाच्या सुरुवातीला गुजरात टायटन्सने (GT) मुंबई इंडियन्सला (MI) घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. त्यानंतर पुढील सामन्यात मुंबई इंडियन्सनं पराभवाचा वचपा काढत विजय मिळवला. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील मुंबई इंडियन्सचा दमदार विक्रम पाहता आकडेवारीनुसार, मुंबईचं पारड जड आहे.

मुंबई विरुद्ध गुजरात हेड-टू-हेड
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघ तीन वेळा आमने-सामने आले आहे. या आकडेवारीनुसार, मुंबई इंडियन्सचं पारड जड आहे. तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्याने अहमदाबादमध्ये या हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी आयपीएल विजेत्या मुंबईचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएल 2022 (IPL 2022) आणि आणि आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये प्रत्येकी एका लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सामना
पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सातव्या अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना आज, 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 26-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here