गोळप सडा येथून दुचाकी चोरीस

0

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप सँडा येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधील दुचाकी अज्ञाताने लांबवली.

याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, १३ मे रोजी रात्री ९ ते मंगळवार, १६ मे रोजी सकाळी १० वा. कालावधीत घडली आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री त्यांनी आपली हिरो होंडा सीडी डिलक्स (एमएच ०८ – एए-४७६२) रेड स्टोन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. १६ मे रोजी सकाळी ते दुचाकी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. फिर्यादीने आजूबाजूला दुचाकीचा शोध घेऊन अखेर बुधवार, २४ मे रोजी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 26-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here