मिरजोळीला ‘जेएसडब्ल्यू’कडून १८० पथदीप

0

चिपळूण : जे.एस.डब्ल्यू. सहकार्याने कंपनीच्या सीएसआर फंडातून तालुक्यातील मिरजोळी गावामध्ये सुमारे १८० पथदीप बसविण्यात येणार आहेत. मंगळवार, दि. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता कंपनीचे अधिकारी वैभव संसारे यांच्या हस्ते उद्घाटन करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मिरजोळी ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच गणेश निवाते, सदस्या प्रचिती भैरवकर, वृषाली कदम, माधुरी सकपाळ, मुमताज दलवाई, रुचिता पवार, संदीप जाधव, विनोद पवार, सामाजिक कार्यकर्ते सयाजी पवार, चंद्रकांत पवार, आदिब दलवाई, गंगाराम साळवी, राजाराम निवाते, प्रकाश पवार, अभिजित पवार, पोलीस पाटील नंदिनी पवार, करिष्मा पवार, संजीवनी मोरे, ग्रामसेवक सुभाष माळी, नितीन जाधव, राजेश जाधव, मिलिंद सकपाळ आदी उपस्थित होते.

या उद्घाटनप्रसंगी बोलताना जेएसडब्ल्यूचे अधिकारी वैभव संसारे यांनी सांगितले की, मिरजोळी गाव हे शहरालगतचे गाव आहे. मिरजोळी गाव झपाट्याने विकसित होत आहे. ग्रामपंचायत मिरजोळीकडून स्ट्रीटलाईटची मागणी करण्यात आली होती. या सर्व बाबींचा विचार करून ३० वॅटचे सुमारे १८० पथदीप उपलब्ध करून देण्यात आले. कंपनीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापुढेही गावाच्या विकासकामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन कंपनीचे अधिकारी वैभव संसारे यांनी दिले. आरोग्य सेवक इकबाल चौगुले यांनी प्रस्तावना केली. चौगुले यांना जनसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रा.पं.च्या वतीने सत्कार करण्यात आला. उद्योजक, काँग्रेस नेते इब्राहिम दलवाई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोटे, खेर्डी आणि खडपोली औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे या गावाची विकासकामे सीएसआर फंडातून केले जातात तसेच गावही दत्तक घेतले जातात. येथील सुशिक्षित बेरोजगार तरूण-तरूणींना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दलवाई यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांचे आभार मिलिंद सकपाळ यांनी मानले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 27-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here