रत्नागिरी : उदय सामंत फाऊंडेशन, रत्नागिरी आयोजित चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या इंग्रजी ” Life Sketch Of A Great Bioghrapher – Dhanajay keer ” “चरित्रकार धनंजय कीर ” या चरित्र ग्रंथाचे – मराठी सुधारित आवृत्तीचे प्रकाशन समारंभाचा कार्यक्रम रविवार दि. २८ मे रोजी स्थळ – स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे दुपारी १२.०० ते २.०० वा. या वेळेत आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर (माजी कुलगुरु, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) प्रमुख अतिथी : मा. ना. श्री. उदयजी सामंत (मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रत्नागिरी – रायगड जिल्हा) तसेच प्रमुख पाहुणे मा. श्री. विजय कुवळेकर (ज्येष्ठ पत्रकार – साहित्यिक) यांना निमंत्रित केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:52 PM 27/May/2023
