दापोली कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी उज्ज्वला चक्रदेव

0

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांच्याकडे देण्यात आला आहे.

कुलगुरूपदी चक्रदेव यांची अतिरिक्त कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याने दापोली कोकण कृषी विद्यापीठाला ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला कुलगुरू मिळाला आहे. दि. २८ मे रोजी दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. संजय सावंत सेवानिवृत्त होत असल्याने चक्रदेव यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू निवडीची दि. २८ मे रोजी पाच सदस्यांची मुलाखत निवड समितीसमोर होणार आहे. या पाच सदस्यांतून दापोली कोकण कृषी विद्यापीठाला कुलगुरू मिळणार आहे. कुलगुरूंची निवड होईपर्यंत चक्रदेव या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रति कुलगुरू असतील. त्यांच्या नियुक्तीचे पत्र राज्यपाल रमेश बैस यांनी जाहीर केले आहे. उज्ज्वला चक्रदेव एस.एन.डी.टी. महिला युनिव्हर्सिटी मुंबई येथे कुलगुरूपदी विराजमान आहेत. दोन्हीही विद्यापीठाचा पदभार काही दिवस त्या सांभाळणार आहेत. राज्यपाल रमेश बैस यांनी आदेशावर स्वाक्षरी केल्याने चक्रदेव यांची अतिरिक्त कुलगुरूपदी वर्णी लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 5/29/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here