भरकटलेल्या जहाजावरील सर्व खलाशी सुखरूप

रत्नागिरी : भरकटलेल्या जहाजावरील सर्व 13 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हे जहाज दुबईहून कारवारला गेलं होतं, त्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलं. मात्र समुद्रात निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाची सूचना मिळाल्यानंतर हे जहाज रत्नागिरीतल्या भगवती ब्रेकवॉटर जवळ आश्रयाला आलं. मात्र अँकरसकट बुधवारी सकाळी हे जहाज भरकटले. त्यानंतर ते जहाज मिऱ्या समुद्रकिनारी धडकले. डिझेल वाहून नेणारं हे जहाज दुबईवरुन मुंबई-जयगड नंतर कारवारला गेलं. कारवारला डिझेल खाली करुन हे जहाज परतीच्या मार्गाला लागलं होतं. मात्र वादळ येण्याची माहीती मिळाल्यानंतर रत्नागिरीच्या भगवती समुद्र किना-यावरील ब्रेक वाँटर वाँल येथे हे जहाज अँकर टाकून उभं करण्यात आलं होतं. मात्र प्रचंड वादळ आणि अजस्र लाटांमुळे हे जहाज अँकरसकट समुद्रात भरकटले. त्यानंतर हे जहाज मिऱ्या समुद्रकिनारी धडकलं. या जहाजावर 13 खलाशी होते. या खलाशांना स्थानिक प्रशान आणि ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. यातील 10 खलाशी हे भारतीय तर 3 खलाशी परदेशी असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच या जहाजावर परदेशी खलाशी असल्याने या सर्व खलाशांची स्वाब टेस्ट करून क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:49 PM 03-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here