मंदिरात ड्रेसकोड लागू करणं चुकीचं, मग पुजाऱ्यांना ड्रेस घालायला द्या; छगन भुजबळांची टीका

0

मुंबई : कोणत्याही मंदिरात ड्रेसकोड (Dress Code) लागू करणे, हा मुर्खपणा असून काही दिवसांपूर्वी कोणत्यातरी मंदिरात (Mandir) हाप पॅंट घालून आल्यावर त्या मुलाला जाऊ दिले नाही, हा मुर्खपणा असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

मंदिरामधील बसलेले पुजारी अर्ध नग्न अवस्थेत असतात. त्यांनाही एखादा सदरा घालण्याची सक्ती करावी,अशी मागणी
छगन भुजबळ यांनी केली.

एकीकडं सध्या मंदिरांमधील ड्रेसकोड (Mandir Drescode) वरून वेगवेगळे दावेप्रतिदावे केले जात आहेत. सप्तशृंगी गडावरील Saptshrungi Gad) मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याच्या हालचाली विश्वस्थांनी सुरू केल्या आहेत. अशातच आज नाशिक (Nashik) येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत छगन भुजबळ बोलत होते. ते यावेळी म्हणले की, कोणत्याही मंदिरात ड्रेसकोड लागू करणे हा मूर्खपणा असून काही दिवसांपूर्वी कोणत्यातरी मंदिरात हाप पॅंट घालून आल्यावर त्या मुलाला जाऊ दिले नाही, हा मुर्खपणा आहे. कोणत्याही मंदिरात जाताना नीट नेटके कपडे घालावे, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. ड्रेस कोड वर बोलायचे झाले तर उघड्या बंब पुजाऱ्यांनी नीट सदरे घालावे, गळ्यात माळा घालाव्या, म्हणजे ओळखू येतील, ते ही अर्धनग्नच असतात ना.. त्यांनाही एखादा सदरा घालण्याची सक्ती करावी.

नवीन संसद भवनाच्या (Parliament House) उद्घाटन सोहळ्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, या सोहळ्याबद्दल अतिशय वाईट वाटले. पहिल्या संसद भवनाच्या वेळी स्वातंत्र्याचे लढव्यये होते. आता मात्र उघड बंब माणसं होती. त्यांच्या मध्येच पंतप्रधान मोदी उभे होते. या सोहळ्यावर पवार म्हणाले ते खरे आहे. या धर्मकांडमध्ये सहभागी झालो नाही, याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात लोकशाही व्यवस्था आहे, राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत मोदींनी जे केले ते मनाला वेदना देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असा सोहळा राम मंदिर शिव मंदिरात ठीक होता पण हे लोकशाहीच्या मंदिरात अपेक्षित नव्हता, अशी टीका त्यांनी केली.

जयंती साजरी करण्यास विरोध नाही….

महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला माझा विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहे त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना मनाला दुःख देणारी आहे अशा भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असतांना कार्यक्रम तिथे का घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे. हा मूर्खपणा कुणी केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुतळे हटविण्याचे काम का केले जाणीवपूर्वक हे केले का हे शोधले पाहिजे व त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिवसाढवळ्या काही लोकांनी बँक लुटली…

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, नाशिकची बँक सर्वात मोठी होती तर देशातील दुसऱ्या नंबरची बँक होती. दिवसाढवळ्या बँक काही लोकांनी लुटली. या बँकेवर प्रशासक येण्यासाठी मी प्रयत्न केला. बँक पूर्व पदावर यायला आणखी वेळ लागेल. फडणवीस यांचा काही निधी आला इतर पैसे कुठे गेले पत्ता नाही. आज शेतकऱ्यांना खासगी बँकांकडे जावे लागते आहे. स्वाहाकारी नेत्यांनी बँकेची वाट लावली. याबाबत जनतेने आवाज उठविला पाहिजे. जुन्या नोटां सुद्धा बदलून दिल्या नाही. जनेतच्या पैशांचे नुकसान झाले. मोठ्या शेतकऱ्यांनी पैसे भरले पाहिजे पण लहान शेतकऱ्यांवर कारवाई केली नाही पाहिजे. बँक पूर्वीसारखी होत नाही, तोपर्यंत निवडणूक होऊ नये, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काही लोकांकडून गैरसमज….

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या निवडीबद्दल ते म्हणाले की, काही लोकांकडून गैरसमज पसरवला जात आहे. एकीकडे पुण्यात शेळकेंना जबबादारी दिली म्हणून अजित पवार यांना बाजूला केले का? असा सवाल करत नवीन लोकांवर जबाबदारी दिली जात आहे. नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पोलिसांनी गुन्हेगारी रोखली पाहिजे. पोलिसांना कोण रोखतंय? असा सवाल उपस्थित करून पोलिसांचा जरब नाहीये.मुंबई पुण्यासारखं नाशिक शहर मोठ नाही. पोलिसांनी गुन्हेगारी कंट्रोल केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:18 PM 5/29/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here