‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज ऑनलाईन कार्यक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ४ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आज ४ जून या दिवशी सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत फेसबुकवर Facebook.com/HinduAdhiveshan आणि यू-ट्यूबवर YouTube.com/HinduJagruti या संकेतस्थळांवर थेट प्रसारण होणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज एक चक्रवती सम्राट’ या विषयावर उदय माहरकर, ‘हिंदवी स्वराज्य’ या विषयावर डॉ. सच्चिदानंद शेवडे, तर ‘छत्रपती शिवरायांच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र’ या विषयावर रमेश शिंदे हे संबोधित करणार आहेत. या अनमोल विचारधनाचा लाभ घ्यावा, असे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:55 AM 04-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here