दुचाकीला मोटारीची धडक, मोटार चालकावर गुन्हा दाखल

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरिल जिगडे फाटा रस्त्यावर मोटारीने दुचाकीला ठोकर देत त्यात दुचाकीस्वार जखमी झाला. खेड पोलिस ठाण्यात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश वसंत जोहरी (वय ३५, रा. इनायरानगर पोस्ट ऑफिसच्या मागे, जंगलमंगल रोड, भांडूप- मुंबई) असे मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवार दि. १जूनला सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर जिगडे फाटा येथे घडली. जोहरी हे मोटार (क्र.एमएच- ०१ एआर ७०५३) चिपळूण ते मुंबई असे घेऊन जात असताना मोटार निष्काळजीपणे चालवून दुचाकी (क्र. एमएच-०८ एएफ १४०४) ला मागून ठोकर दिली. यामध्ये दुचाकीस्वार भागोजी बाईत (वय ५५, रा. असगणी ) यांच्या पायाला व तसेच किडनिला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल कण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:17 PM 04-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here