वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुलाचा मृतदेह

0

चिपळूण : खेर्डी शिवाजीनगर येथील वेदांत राजेंद्र खांबे या १३ वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी (दि. ३१) सायंकाळी
वाशिष्ठी नदीपात्रात शंकरवाडीजवळ आढळून आला.

विनायक रामचंद्र खांबे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात खबर दिल्यानुसार, त्यांचा पुतण्या वेदांत राजेंद्र खांबे (१३, रा. खेर्डी शिवाजीनगर चिपळूण) हा वाशिष्ठी नदीपात्रात पाय घसरून पडल्याने वाहून गेला होता. त्याचा मृतदेह शंकरवाडीजवळ वाशिष्ठी
नदीपात्रात आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 6/2/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here