दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलीच अव्वल, तर कोकण विभाग नंबर वन; पाहा विभागनिहाय टक्केवारी

0

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे.

तर यंदा 3.11 टक्क्यांनी निकाल घसरला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 92.05 टक्के आहे.

यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे, तर नागपूर विभाग तळाशी आहे. कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल 92.05 टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.

दहावी निकालाची विभागनिहाय टक्केवारी

कोकण विभाग : 98.11 टक्के
कोल्हापूर विभाग : 96.73 टक्के
पुणे विभाग : 95.64 टक्के
मुंबई विभाग : 93.66 टक्के
औरंगाबाद विभाग : 93.23 टक्के
अमरावती विभाग : 93.22 टक्के
लातूर विभाग : 92.67 टक्के
नाशिक विभाग : 92.22 टक्के
नागपूर विभाग : 92.05 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 नं कमी झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 6/2/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here