Maharashtra SSC Result 2023: सिंधुदुर्ग अव्वल, राज्यात 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, जाणून घ्या दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये

0

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे.

राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे. 2020 मध्ये दहावीचा निकाल 95.30 टक्के, 2021 मध्ये 99.95 टक्के तर 2022 मध्ये 96.94 टक्के निकाल लागला होता. यंदा 93.83 टक्के निकाल लागला आहे. याचाच अर्थ यंदा निकालात 3.11 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.49 टक्के आहे. याशिवाय 29.74 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. निकालाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

दहावीचा निकालाची वैशिष्ट्ये

* राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के
* पुनरपरिक्षार्थींचे उत्तीर्णतेचे प्रणाम 60.90 टक्के
* खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 74.25
* दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 92.49 टक्के
* राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 98.11टक्के
* एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्क्यांपेक्षा जास्त.
* मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त.
* राज्यातील 5,26210 विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत, 3,34,015 द्वितीय श्रेणीत तर 85218 उत्तीर्ण.
* 14 जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत उपलब्ध होतील
* यावर्षी दहावीचा निकाल 93.83 मागील वर्षी तो 96.94 टक्के होता. याचा अर्थ मागील वर्षीपेक्षा 3.11 टक्क्यांनी निकाल घटला.
* 2020 मधील निकालाशी तुलना करता यावर्षीचा निकाल 1.47 टक्के
* जिल्हा निहाय 3 टॉप- सिंधुदुर्ग 98.54 टक्के, रत्नागिरी 97.90 टक्के, कोल्हापूर 97.21 टक्के
* 29.74 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के
* राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151
* राज्यात 23 तृतीयपंथी विद्यार्थी उत्तीर्ण

विभागवार निकाल

कोकण : 98.11 टक्के
पुणे : 95.64 टक्के
कोल्हापूर : 96.73टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
नागपूर : 92.05 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
मुंबई : 93.66 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 नं कमी झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 6/2/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here