रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दि. ८ जून रोजी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल व ठाणे येथील करिअर क्राफ्ट एम्प्लॉयमेंट ॲडव्हायजर एल. एल. पी. यांच्या संयुक्त विद्यमाने या मुलाखती घेण्यात येणार आहेत. येस बँकेतील सेल्स ऑफिसर या पदांकरिता रत्नागिरी बँचमध्ये जागा भरावयाच्या आहेत. याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी येस बँक, पर्णिका एम्पायर, शिवाजी नगर येथे सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे.
सोबत येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणावीत. या मुलाखतीसाठी २०१९- २०, २०२० २१, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये पदवी घेऊन बाहेर पडलेले तसेच २०२२-२३ या वर्षामध्ये पदवी परीक्षा दिलेले कोणत्याही शाखेतील विद्यार्थी पात्र असतील. अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 6/2/2023