रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी होईल

0

◼️ अध्यक्षपदासाठी बाबा मयेकर यांना उमेदवारी

जाकादेवी : रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक ४ जून रोजी होणार असून या निवडणुकीत रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व प्रसिद्ध उद्योजक भैय्याशेठ सामंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल विजयी होईल असा विश्वास रत्नागिरी तालुक्यातील युवा नेते रोहित मयेकर यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी जिल्हा व तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या मार्फत रत्नागिरी तालुक्यात कबड्डी संघ भरवून कबड्डी संघांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते. अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले जाते. या असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक ४ जून रोजी रत्नागिरी येथील दामले विद्यालय येथे पार पडणार आहे. या असोसिएशनच्या एकूण ८ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.या पॅनेलला मंत्री उदय सामंत व भैय्याशेठ सामंत यांनी पाठिंबा दिला आहे. या पॅनेलने प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.

जाहीर उमेदवार पुढीलप्रमाणे-
यामध्ये तालुका असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी शैलेश शिरीष मयेकर, कार्याध्यक्ष पदासाठी अभिषेक दिलीप पाटील, उपाध्यक्ष पदासाठी दिलीप तुकाराम गावडे आणि अरुण बाबू झोरे, प्रमुख कार्यवाहपदासाठी सिद्धेश गजानन जठार, खजिनदार पदासाठी दत्तप्रसाद परशुराम तोडणकर, सहकार्यवाह पदासाठी संदेश मारुती चव्हाण आणि प्रणाली प्रकाश शितोळे अशा ८ जागांसाठी ८ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उदय सामंत तसेच उद्योजक भैय्याशेठ सामंत यांच्या पाठिंब्यावर घोषित करण्यात आलेले सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास युवा नेते रोहित मयेकर यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:50 PM 6/2/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here