६ जूनला साळवी स्टॉप येथील बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर

0

◼️ TWJ असोसीएटर आणि लायन्स क्लब रत्नागिरीच्या माध्यमातून सौ.पूजा दीपक पवार यांनी केले आयोजन

◼️
ना.उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या संकल्पनेतून होणार शिबिर संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ.पूजा दीपक पवार यांच्या पुढाकाराने आणि पालकमंत्री ना.उदय सामंत आणि रत्नसिंधूचे सदस्य किरण सामंत यांच्या संकल्पनेतून ६ जूनला सकाळी १० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत साळवी स्टॉप येथील बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्योग मंत्री ना.उदय सामंत आणि रत्नसिंधु योजनेचे सदस्य श्री किरण सामंत यांच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून हे शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी TWJ असोसीएटर आणि लायन्स क्लब रत्नागिरीच्या माध्यमातून सौ.पूजा दीपक पवार यांनी केले आयोजन केले आहे.

या शिबिरात मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू तपासणी, चष्मा नंबर तपासणे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन असे शिबिराचे आयोजन केले गेले आहे. या संधीचा लाभ गरजूनी घ्यावा, असे आहवान सामाजिक कार्यकर्त्यां सौ.पूजा दीपक पवार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:57 PM 6/3/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here