राजापुरातील तमाशा कलावंत सखाराम मोकल यांचे निधन

0

राजपूर : दापोली राजापुरातील तमाशा कलावंत सखाराम मोकल यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक कलेच्या वारशाचा चालता बोलता कलाकार हरपल्याची लोकभावना दापोली तालुक्यात व्यक्त होत आहे.

तमाशा कलावंत सखाराम मोकल हे राजापूर गावातील सामाजिक कार्यकर्ते असून ते श्री भैरवनाथ प्रसन्न ग्रामदेवतेचे भक्त होते. संपूर्ण पंचक्रोशीत त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगे, विवाहित मुली, सुना, नातवंडे, पतवंडे, भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. सामाजिक वैचारिक भान असलेले प्रयोगशील नेतृत्व आणि पुरोगामी विचारांची बांधिलकी जोपासणारे प्रगल्भ व्यक्तिमत्तव सर्वोत्तम कलाकार म्हणून त्यांची ओळख होती.

गेली अनेक दशके त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून तमाशा, भारुड, विविध सामाजिक प्रबोधनाची गाणी सातत्याने गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलची प्रचंड तळमळ व धडाडी या उतरत्या वयातही बरेच शिकवून गेली. त्यांनी केलेले मौलिक कार्य भविष्यात येणाऱ्या पिढीस व समाजात सदैव प्रेरणादायी ठरेल असेच आहे. श्री भैरवनाथ प्रसन्न ग्रामदेवतेच्या शिमग्यातील तमाशा थाप तुंतुण्याच्या दणदणीत आवाजाच्या गजराने गाजवून टाकायचे.
इतरांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे सखाराम बाबा मोकल समाज आणि कला या दोन्हींचे उत्तम भान असलेले हरहुन्नरी कलावंत होते. ते हरपल्याचे दुःख एका प्रतिभावंत आणि संवेदनशील कलाकाराला मुकला असून रंगभूमीवरील अभिनयाच्या तेजस्वी पर्वाचा अंत झाल्याची खंत राजापूर ग्रामस्थ मंडळाने व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 6/6/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here