‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची झपाट्याने वाढ; मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

0

मुंबई : मुंबईसह कोकणात मान्सून अगोदर बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार आहे.

येत्या २४ ते ४८ तासांत हे चक्रीवादळ मुंबई आणि कोकणच्या सागरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ‘बिपरजॉय’ नावाचे हे चक्रीवादळ तयार झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या मते, येत्या २४ तासांत या वादळाची स्थिती आणि दिशा स्पष्ट होईल. हवामान खात्याच्या मुंबई शाखेने ट्विट करून या संदर्भातील माहिती दिली आहे.

हे चक्रावादळ समुद्राच्या पृष्ठभागापासून ५.८ किलोमीटरपर्यंत पसरले आहे. आग्नेय अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हे वादळ येत्या २४ तासांत ८, ९, १० जून पर्यंत कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकेल. त्याचा वेग ४०-५० ते ६० किलोमीटर प्रति तास असा अंदाज आहे. यादरम्यान समुद्रात उंच लाटा उसळतील. दरम्यान, सतर्कतेचा इशारा देत मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या चक्रीवादळाचे केंद्र समुद्राच्या खोलवर असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता पाहता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.येत्या २४ तासांत हे वादळ उत्तरेकडे सरकणार आहे. सध्या ते मुंबईपासून ११२० किमी, गुजरातमधील पोरबंदरपासून ११६० किमी आणि गोव्यापासून ९२० किमी अंतरावर आहे. आज सकाळच्या परिस्थितीचा अंदाज घेत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे शाखेचे प्रमुख कृष्णानंद एस होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

मागच्या तीन तासात हे वादळ ११ किलोमीटर प्रति तासच्या वेगाने पुढे सरकले आहे. उत्तरेकडे सरकणाऱ्या या वादळाचा वेग हळूहळू वाढू लागेल. पुढील १२ तासांत तो आपला वेग वाढवेल आणि ताशी ४०-५० ते ६० किलोमीटरच्या वेगापर्यंत जाईल. मात्र या चक्रीवादळाचे केंद्र खोल समुद्रात असल्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:50 PM 6/6/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here