इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतन प्रथम वर्ष प्रवेशाबाबत आवाहन

0

रत्नागिरी : तंत्रनिकेतन (Polytechnic) प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 प्रवेश प्रक्रियेकरिता शासकीय तंत्रनिकेत, रत्नागिरी येथे (FC 3009) हे सुविधा केंद्र सुरू असून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणे १ ते २१ जून (तात्पुरते), कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती १ ते २१ जून तात्पुरती गुणवत्ता यादी २३ जून, गुणवत्ता यादीवरील आक्षेप / अर्ज दुरुस्ती २४ जून, अंतिम गुणवत्ता यादी २९ जून रोजी जाहीर होईल.

डिप्लोमा प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर Option Form भरणे, विविध प्रवेश फेऱ्या cap round), निवड झालेल्या संस्थेमध्ये प्रवेश निश्चिती इत्यादी बाबतचे वेळापत्रक Poly23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विदयार्थ्यांनी Poly23.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी अर्ज शुल्क 400 रुपये तर राखीव प्रवर्गातील विदयार्थ्यासाठी 300 रुपये आहे. ऑनलाईन पध्दतीमध्ये E-Scrutiny व Physical Scrutiny (प्रत्यक्ष हजर राहून पडताळणी ) असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामधील E-Scrutiny पर्यायाने अर्ज करणाऱ्या विदयार्थ्यांना कोणत्याही सुविधा केंद्रावर ((FC) न जाता स्वतः कागदपत्रे upload करण्याची सुविधा असून त्यांची कागदपत्रे व अर्ज सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन पडताळून निश्चित करण्यात येतील. तसेच Physical Scrutiny पर्यायाने अर्ज करणाऱ्या विदयार्थ्यांना सुविधा केंद्रावर (FC) प्रत्यक्ष हजर राहून स्वतः च्या अर्जाची नोंदणी व कागदपत्रे upload करून घ्यावी लागतील.

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी संस्थेमध्ये स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी १२०, संगणक (Computer) अभियांत्रिकी 60, विदयुत (Electrical) अभियांत्रिकी ६० असे एकूण ४८० विदयार्थी प्रवेश क्षमतेसह, अणुविदयुत (Electronics & Tele Communication) अभियांत्रिकी ६०, यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी– १२० तर मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी प्रवेश क्षमता ६० असे एकूण 480 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.

गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षात ५६ विदयार्थ्याचे Campus Placement झालेले असून अजूनही प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:55 PM 6/6/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here