Breaking : मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती

0

नवी दिल्ली : अखेर मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे.

आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. देशात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिलीय. हवामान खात्यानं तशी माहिती दिलीय. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत.

हवामान खात्यानं शनिवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 6/8/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here