भारतीय क्रिकेट नंतर आता म्हाडा चालक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना भगवी किनार असणारा गणवेश

0

मुंबई : म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी म्हाडाचा कारभार आपल्या हाती घेताच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन म्हाडा बद्दल जनमानसातील प्रतिमा उंचावली आहे. गेल्या काही दिवसात म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी अनेक लाभदायी निर्णय घेण्यामध्ये म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यशस्वी झाले आणि त्यातलाच एक निर्णय म्हणजे वाहक आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा गणवेश. आत्ता वाहक आणि कर्मचाऱ्याना प्रति वर्षी एक ऐवजी तीन गणवेश मिळणार आहेत आणि धुलाई भत्ता ५० वरून २५० प्रति महिना मिळणार आहे. या गणवेशाचे वैशिष्ट म्हणजे या गणवेशाचा शर्ट हा सफेद असणार आहे, परंतु कॉलर वर भगवी किनार असणार आहे तसेच खांद्यावर भगव्या बॅग्राऊंड वर काळ्या अक्षरात म्हाडा लिहिलेलं असेल. हे गणवेश १५ ऑगस्ट पासून वितरित केले जाणार आहेत. एकूणच काय भारतीय क्रिकेट नंतर आत्ता म्हाडा मध्ये गणवेशात भगवी किनार असल्याचे आपल्याला पाहवयास मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here