पुढील तीन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

0

मुंबई : आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

पुढील तीन दिवस म्हणजे १२ जूनपर्यंत राज्यातील मुंबईसह कोकण, खान्देश नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मराठवाडा विदर्भात मात्र ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता आहे.

‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) सकाळी गोवा ते येमेन देशाच्या आग्नेय किनारपट्टी दरम्यान सरळ रेषेत जोडणाऱ्या अंतराच्या मध्यावर खोल अरबी समुद्रात आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याची विशेष नुकसानदेही परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.

मान्सूनने केरळचा संपूर्ण भाग आणि तामिळनाडूचा ३० टक्के भाग व्यापला आहे. एक जून या सरासरी तारखेला केरळात आदळणारा मान्सून चार दिवस उशिराने म्हणजे चार जूनला येणं अपेक्षित होतं.

मान्सून गुरुवार दिनांक ८ जुनला केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सून आगमनाच्या अटी पुर्ण करून दाखल झाला आहे. जवळपास कव्हर करून देशाच्या भुभागावर दाखल झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:45 PM 6/9/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here