धमक्या देऊन कुणी आवाज बंद करु शकत नाही : शरद पवार

0

मुंबई : “तुझा लवकरच दाभोळकर होणार” अशी धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्वीटरवर देण्यात आली होती.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुवस्थेवर मला विश्वास आहे, त्यामुळे याची मला चिंता नाही, असे शरद पवार म्हणाले.

कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मला चिंता नाही. पण ज्यांच्या हातात राज्यातील सुत्रे आहेत.. त्यांना जबाबदारी टाळता येत नाही, असे शरद पवार म्हणाले.

धमकीची मला कोणतीही चिंता नाही. कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांना देण्यात आली आहे, ज्यांच्यावर आहे, त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असे शरद पवार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:20 PM 6/9/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here