नाचणे येथे जुगारप्रकरणी एकावर गुन्हा

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथे बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवणाऱ्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई बुधवार, ७ जून रोजी सायंकाळी ४.३० वा. नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या भिंतीलगत टपरीच्या आडोशाला करण्यात आली. समीर अशोक खाडे (वय ४७, रा. वरचे टेंबे खाडेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी शहर पोलिस नाचणे परिसरात गस्त घालत असताना त्यांना संशयित जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जवळ बाळगून खेळ चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:20 PM 6/9/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here