Ratnagiri : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

0

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडुन मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून सदर वादळामुळे 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे.

तरी दि 9 ते 12 जून या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात पर्जन्यमान विषयक व वा-याच्या वेगाविषयक खालील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या कालावधीत जिल्ह्यातील पर्जन्यमान स्थिती पुढील प्रमाणे : – 9 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी वादळी वारा ( वा-याचा वेग 30-40 कि.मी. प्रती तास) व विजांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.10 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा ( वा-याचा वेग 30-40 कि.मी. प्रती तास) व बोजाच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. 11 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. तर 12 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर दि 9 जून रोजी कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. काही ठिकाणी किमान 40 ते कमाल 60 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. 10 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा-महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रतितास वेगाने तर कमाल 55 किमी वारे वाहण्याची शक्यता आहे.11 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रतितास वेगाने तर दि .12 जून रोजी कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. आणि समुद्राजवळून 40-50 किमी तर कमाल 55 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी सदर कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जावू, पोहण्यासाठी समुद्रात उतरू नये, समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नये.

कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :-
1. जिल्हा नियंत्रण कक्ष 02352226248 222233 2. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222
3. प्रादेशिक बंदर विभाग नियंत्रण कक्ष 02352295756 तर जिल्ह्यातील 9 ठिकाणी
तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत असून ते पुढील प्रमाणे : 1. राजापूर 02352-222027
2. लांजा 02351295024
3. रत्नागिरी 02352-223127
4. संगमेश्वर ()02354 260024
5. चिपळूण 02355295004
6. गुहागर 02359240237
7. खेड 02356263031
8. दापोली 02358282036
9. मंडणगड 02350 225236

या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संपर्क करावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, कोणत्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्राकडून करून घ्यावी असे आवाहन एम. देवेंदर सिंह जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:46 PM 6/9/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here