रायगडावर साधेपणाने शिवराज्याभिषेक दिन सोहळा

रायगड : दरवर्षी रायगडावर एकचं धून सहा जून असं म्हणत जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. मात्र यंदा कोरोना संकटामुळे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने साधेपणाने शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. यंदा कोरोनाच्या सावटामुळं शिवप्रेमी रायगडावर पोहोचू शकले नसले तरी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:01 AM 06-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here