‘भारतात अद्याप कोरोनाचा विस्फोट नाही’ : WHO

कोरोनाच्या साथीचा भारतात विस्फोट होण्याऐवजी ती काहीशा कमी वेगाने वाढत आहे. इटली, स्पेन, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये देशव्यापी लॉकडाऊननंतर काही आठवड्यातच त्याचा स्फोट झाला त्यामुळे तेथे त्याचे सर्वोच्च शिखर लवकर आले. पण, भारतात लॉकडाऊनला 90 दिवस उलटूनही त्याचे शिखर आल्याचे जाणवत नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ मायकेल रियान म्हणाले, करोना बाधित दूप्पट होण्याचा वेग भारतात सध्या तीन आठवड्याचा आहे. या साथीचा भारतात अद्याप विस्फोट झालेला नाही. मात्र लॉकडाऊन उठवण्याच्या कृतीमुळे विस्फोट होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले. सध्या करोनाची भारतातील स्थिती विस्फोट होण्यासारखी नाही. मात्र करोनाची व्याप्ती वाढत आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे स्वरूप भिन्न आहे. नागरी आणि ग्रामीण भागातही त्याच्या संसर्गात फरक दिसत आहे, असे ते म्हणाले. दक्षिण आशियात केवळ भारतातच नव्हे तर बांगलादेश आणि पाकिस्तानातही लोकसंख्येची घनता अधिक आहे. मात्र तेथेही साथीचा विस्फोट घडलेला नाही. मात्र तेथे ते घडण्याची शक्‍यता आहे, असे रियान म्हणाले. ते जिनिव्हात बोलत होते. ते म्हणाले, सध्या भारतासारख्या महाकाय देशात लोक बाहेर पडत नाहीत पण ते बाहेर पडू लागताच बाधितांची संख्या वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. भारताने केलेल्या उपाययोजनांमुळे येथे साथ आटोक्‍यात असल्याचे मतही त्यांनी नोंदवले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:02 PM 06-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here