जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या 361वर

रत्नागिरी : मागील चोवीस तासात प्राप्त अहवालांमध्ये 18 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 361 झाली आहे. तसेच 79 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चोवीस तासात सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये संगमेश्वर 9, राजापूर 2, कामथे 6 आणि रत्नागिरीतील एका रुग्णाचा समावेश आहे. रविवारी दिवसभरात 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत 167 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने 13 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 181 आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:14 AM 08-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here