शरद पवार उद्यापासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळाने रायगड, कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोकण वासियांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर येणार आहेत. शरद पवार उद्या (9 जून) रायगड जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची आणि प्रशासनाकडून सुरु असलेल्या कामांची माहिती जाणून घेतील. त्यानंतर 10 जून रोजी ते रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही मंत्रीसुद्धा असतील.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:25 PM 08-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here