चिरेखाणी बंदिस्त करण्यात याव्यात

रत्नागिरी : जिल्ह्यात मोठया प्रमाणात जांभ्या दगडाच्या चिरेखाणी आहेत. मात्र, या चिरेखाणींना बंदिस्त आवार नसल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. पावसाळयात साचणार्‍या पाण्यामुळे त्या भरत असल्याने त्यांचा धोका वाढत आहे. निवळी, हातखंबा, संगमेश्‍वर तसेच देवरुख भागात मोठया प्रमाणात अशा चिरेखाणी असून त्या बंदिस्त करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिरेखाणी आहेत. उन्हाळयात दिवसरात्र या चिरेखाणीतून चिरे काढण्याचे काम केले जाते. तसेच महसूल विभागाकडून काही ठिकाणी चिरे काढण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, चिरे काढल्यानंतर या चिरेखाणी बंदिस्त केल्या जात नसल्याने त्यांचा धोका वाढतो. जिल्ह्यात उघडया चिरेखाणींमुळे अनेक दुघर्टना घडल्या आहेत. मात्र, अद्यापही चिरेखाणी बंदिस्त करण्यात आलेल्या नाहीत. पावसाळ्यात चिरेखाणीमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा धोका वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here