५५ वर्षाहून अधिक वय असलेल्या पोलिसांना भरपगारी सुट्टी

मुंबई : कोरोना संकट काळात बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असतानाच राज्यभरात आजपर्यंत ३ हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तसेच अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यात पोलिसांवरील कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने ५० ते ५५ वर्षांदरम्यान असलेल्या पोलिसांना नॉर्मल ड्युटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ५५ वर्षाहून अधिक वय असलेल्या पोलिसांना भरपगारी सुट्टी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here